
तुम्ही अनेकदा घराच्या भींतींवर पाली पाहिल्या असतील, अनेकदा पालींना पाहून लोक पळून जातात. मात्र याच पाली तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

बरेच लोक या पालींपासून लाखो रुपये कमवत आहेत. या पाली उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन बनल्या आहेत. सध्या चीनसह अनेक देशांमध्ये पालींची शेती केली जाते.

चीन, इंडोनेशिया, थायलंड आणि मलेशियासारख्या अनेक आशियाई देशांमध्ये लोक पालींची शेती करतात. यात वेगवेगळ्या प्रकारच्या पालींचा समावेश आहे.

पालींच्या औषधी गुणधर्मांमुळे पालींना आंतरराष्ट्रीय बाजारात लाखोंची किंमत मिळत आहे. चीनसारखे देश अशा पालींची आयात करतात. कारण चीनमध्ये या पालींचा वापर पारंपारिक औषधांमध्ये केला जातो.

टोके गेको नावाची पालीच्या प्रजातीची थायलंड, मलेशिया आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. टोके गेकोला जागतिक बाजारात जास्त मागणी आहे. यातील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर घटक कर्करोग, मधुमेह आणि श्वसन रोगांवर फायदेशीर आहेत.