
मित्र मैत्रिणी, नातेवाईकांशी संवाद साधा: सणासुदीच्या दिवशी तुम्ही एकटे असाल तर मित्र मैत्रिणी, नातेवाईकांशी संवाद साधा. तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकता, व्हिडीओ कॉल करू शकता. संवाद साधल्याने तुम्हाला एकटं वाटणार नाही. आता टेक्नॉलॉजीमुळे संपर्क साधणं सहज शक्य आहे. त्यामुळे छान आवरून एकदम फ्रेश मूड मध्ये सगळ्यांना व्हिडीओ कॉल करा.

स्थानिक समारंभात सामील व्हा: तुम्ही एकटेच राहात असाल तर तुमच्या सोसायटीमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात दिवाळी साजरी केली जात असेल तुम्ही त्यात देखील सहभागी होऊ शकता. एकटेपणा दूर करायचा असेल तर अशा कार्यक्रमांनी सहभागी व्हा.

देव दिपावली

तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. स्वतःसाठी जेवण बनवा, घर सजवा. तुम्हाला काय आवडतं ते करा, तुम्ही वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. आवडता सिनेमा बघा गाणी ऐका.

सेल्फ केअर: एकटे असाल तर तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. चेहऱ्याची काळजी घ्या, केसांची काळजी. स्किन केअर रुटीन फॉलो करा, व्यायाम करा.