
त्रिशूळ हे तीन गुणांचं प्रतीक मानलं जातं. यात सत्व, रज आणि तम गुण आहे. या तिन्ही गुणांवर महादेवांचं पूर्ण नियंत्रण आहे. त्रिशूळाच्या माध्यमातून ते त्याचं प्रतिकात्मक स्वरूप दाखवतात.

त्रिशूळ भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाचे प्रतिनिधित्व करतो. महादेव त्रिकालदर्शी आहेत. ते काळाच्या बंधनातून मुक्त आहेत आणि त्यांचं त्यावर वर्चस्व दाखवतं.

त्रिशूळाची तिन्ही टोकं ही विश्वाची निर्मिती, पालनपोषण आणि विनाश यांचं प्रतीक आहे. महादेव हे संपूर्ण विश्वाचे निर्माते, पालनकर्ते आणि संहारकर्ते आहेत. ते निर्मिती आणि विनाशाच्या चक्राचे नियंत्रण करते.

त्रिशूळ हे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर महादेवांचे राज्य असल्याचं दाखवते. महादेवांचं प्रत्येक ठिकाणी राज्य आहे, असं दर्शवते.

त्रिशूळ हे अज्ञान, अहंकार, इच्छा आणि वासना यासारख्या नकारात्मक वृत्तीच्या नाशाचे प्रतीक आहे. महादेवाच्या वाईटाचा नाश करण्याच्या आणि सकारात्मकता आणि ज्ञानाचा मार्ग मोकळा करण्याच्या शक्तीचे प्रतिनिधित्व करते.

शिवाचे त्रिशूळ हे पवित्रता आणि सत्कर्मांचे प्रतीक आहे. वाईटाचा नाश करणारे आणि धर्म स्थापित करणारे पवित्र शस्त्र म्हणून त्याकडे पाहिले जाते.