
आपल्या आयुष्यात रंगांचे महत्त्व केवळ कपड्यांपुरते मर्यादित नसते. तर त्याचे थेट कनेक्शन आपल्या नशिबाशी जोडलेले असते. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीसाठी काही खास शुभ रंग असतात, जर तुम्ही दैनंदिन आयुष्यात या रंगाचा वापर केलात तर तुम्हाला निश्चितच त्याचे फायदे मिळतात.

जीवनात यश, सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी तसेच ग्रहांचे शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी हे रंग अतिशय प्रभावी ठरतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील ग्रह आणि राशीनुसार शुभ रंगांचा वापर करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.

योग्य रंगांचा वापर केल्याने आपल्या नशिबाचे दरवाजे उघडतात. यामुळे जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच नातेसंबंध सुधारतात. यामुळे देवी-देवतांची कृपा होऊन प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया, तुमच्या राशीनुसार तुमचा लकी कलर कोणता आहे आणि त्याचा वापर कसा करायला हवा.


मेष, सिंह आणि धनू राशीच्या लोकांनी नोकरीच्या मुलाखतीसाठी, स्पर्धा परीक्षेसाठी किंवा महत्त्वाच्या बैठकींसाठी जाताना लाल, भगवा किंवा सोनेरी रंगाचे कपडे घालावेत. जर तुम्हाला त्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर खिशात रुमाल ठेवावा.

वृषभ, कन्या आणि मकर राशींच्या लोकांसाठी हिरवा आणि निळा रंग शुभ मानला जातो. वृषभ राशीच्या लोकांनी विशेषतः पांढऱ्या रंगाचा वापर करावा. घरात पांढरे कपडे, टॉवेल किंवा बेडशीट वापरल्यास शुक्र ग्रह मजबूत होतो. त्यांना धन-संपत्ती मिळते.

हिरवा रंग बुध ग्रहाचे, तर निळा रंग शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. वृषभ राशीच्या व्यक्तींनी महत्त्वाच्या प्रसंगी किंवा शुभ कामासाठी जाताना हिरवा, निळा किंवा पांढऱ्या रंगांचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला निश्चित फरक जाणवेल.

मिथुन आणि कुंभ राशींवर बुध आणि शनीचा एकत्रित प्रभाव असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी महत्त्वाच्या प्रसंगी आकाशी, राखाडी (ग्रे) आणि चंदेरी (सिल्व्हर) रंगांचा वापर करावा. यामुळे त्यांची मानसिक स्पष्टता वाढते. ते योग्य निर्णय घेऊ शकतात. जेव्हा तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल किंवा मानसिक शांतता हवी असेल तेव्हा हे रंग वापरा.


तुम्ही तुमच्या राशीनुसार शुभ रंगाचा वापर अनेक प्रकारे करू शकता. त्या रंगाचे कपडे, रुमाल, पेन, डायरी किंवा बॅग वापरता येऊ शकते. सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या विशिष्ट रंगाचा रुमाल नेहमी आपल्यासोबत ठेवणे. यामुळे तुम्हाला सतत त्या रंगाची सकारात्मक ऊर्जा मिळत राहते.