या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून निर्माते घराबाहेर लावायचे रांगा, सौंदर्य पाहून आशा भोसले देखील विसरलेल्या रेकॉर्डिंग

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होते अनेक सुपरस्टार, सौंदर्य असं की निर्माते घराबाहेर लावायचे रांगा. आशा भोसले देखील या अभिनेत्री पाहून विसरल्या होत्या रेकॉर्डिंग.

| Updated on: May 17, 2026 | 9:36 AM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीतील गाणी, कलाकारांची अदाकारी आणि त्या काळातील प्रेमकथा आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करताना दिसतात. काळ बदलला असला तरी जुन्या बॉलिवूडमधील किस्से ऐकण्याची लोकांची आवड अजूनही तितकीच कायम आहे.

2 / 5
त्यामुळे जेव्हा एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये किंवा मुलाखतीत जुन्या कलाकारांबद्दल एखादा रंजक किस्सा समोर येतो, तेव्हा तो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतो. सध्या असाच एक खास किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. हा किस्सा प्रसिद्ध गायिका आशा भोसले, दिग्गज अभिनेत्री मधुबाला आणि गायक-अभिनेता किशोर कुमार यांच्याशी संबंधित आहे.

3 / 5
हा किस्सा लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो Indian Idol मध्ये पुन्हा एकदा समोर आला. शोदरम्यान जुन्या बॉलिवूडमधील आठवणींना उजाळा देण्यात आला आणि त्यावेळी मधुबालांच्या सौंदर्याविषयीचा एक रंजक अनुभव सांगण्यात आला.

4 / 5
मधुबाला यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. त्यांचे मोहक हास्य, बोलके डोळे आणि पडद्यावरील अप्रतिम उपस्थिती प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकत असे. आजही अनेक जण त्यांना बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री मानतात.

5 / 5
दरम्यान, शोमध्ये होस्ट आदित्य नारायण यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, एका रेकॉर्डिंगदरम्यान मधुबाला इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांना पाहून स्वतः आशा भोसले काही क्षणांसाठी गाणेच विसरल्या होत्या. आदित्य नारायण यांनी विनोदी अंदाजात म्हटले की, आशा भोसले मधुबालांकडे सतत पाहत राहिल्या आणि त्या जर पुरुष असत्या तर कदाचित मधुबालांच्या प्रेमातच पडल्या असत्या असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us