Madhuri Dixit Birthday : धक-धक गर्लच्या फॅमिलीत कोण-कोण?, भावा-बहिणींसोबतचे हे फोटो पाहिलेत का ?

हम आपके है कौन, दिल तो पागल है, दिल, देवदास, पुकार, ते आजा नचले, एकाहून एक सरस चित्रपटात वेगेवगळ्या भूमिका चपखलपणे साकारत अभिनयाचा ठसा उमटवणारी ,90 च्या दशकांत निर्वीवाद राज्य करणारी, मधुर हास्याने रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित.. बॉलिवूडच्या धक धक गर्लचा आज, अर्थात 15 मे रोजी असतो वाढदिवस... माधुरीने चित्रपटसृष्टीत मेहनत करत खूप नाव कमावले आणि ती नेहमीच याचे श्रेय तिच्या कुटुंबाला देत असे. तथापि, तिचे कुटुंब प्रसिद्धीपासून दूर असतं, पण ती तिच्या कुटुंबियांना खूप मानते.

| Updated on: May 15, 2025 | 1:30 PM
1 / 7
90 च्या दशकांत मोठ्या पडद्यावर निर्वीवाद राज्य करणारी,  मधुर हास्याने आणि नृत्याने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री, माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस असतो. माधुरीचे लाखो नव्हे करोडो चाहते आहेत, आज ती ज्या स्थानी आहे, जितकी प्रसिद्ध आहे, त्याचं कारण हे कुटुंबाचा पाठिंबा असल्याचं ती नेहमी म्हणते. तिच्या कुटुंबात कोण असतं,आईवडील, बहीण-भावाचं नाव काय, जाणून घेऊया. (Photo Credit : Social Media)

2 / 7
वडील शंकर दीक्षित   माधुरी दीक्षितच्या वडिलांचे नाव शंकर दीक्षित होते. ते आता या जगात नाही, 2013 साली त्यांचं निधन झाले. माधुरीच्या वडिलांनी वयाच्या ९१ व्या वर्षी मुंबईतील जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. माधुरी त्यांची खूप लाडकी होती. तिने डॉक्टर व्हावे अशी वडिलांची इच्छा होती, पण माधुरी अभिनेत्री बनली. या कारणास्तव, अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या संमतीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले.

3 / 7
आई स्नेहलता   माधुरी दीक्षितची आई स्नेहलता या प्रत्येक पावलावर अभिनेत्रीच्या पाठीशी उभ्या होत्या. तिचे तिच्या आईसोबत अनेकदा एक खास नाते होते. माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे, तिने मला शिकवलेले धडे माझ्यासाठी सर्वात मोठी भेट होती, असे माधुरी एकदा आईबद्दल म्हणाली होती.

4 / 7
भाऊ अजित दीक्षित  माधुरीच्या भावाचे नाव अजित दीक्षित आहे. तो तिचा सर्वात चांगला मित्र आहे, ती अनेकदा मुलाखतींमध्ये त्याच्याबद्दल बोलते. तिने एकदा भाऊबीजच्या निमित्ताने अजितसोबतचा तिचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ते दोघंही खूप गोड दिसत होते. एका मुलाखतीदरम्यान, माधुरीने खुलासा केला होता की भाऊ अजितनेच तिची, तिचे पती श्रीराम नेने यांच्याशी तिची पहिली भेट घडवून आणली होती. तिच्या भावाने गुपचूप संपूर्ण कुटुंबाला फोन केला आणि त्यानंतर माधुरीला तिच्या निवडीबद्दल विचारले.

5 / 7
बहीण रूपा आणि भारती  माधुरी दीक्षित ही अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. माधुरीच्या दोन्ही बहिणी, भारती आणि रूपा, देखील तिच्यासारख्याच प्रशिक्षित कथक नर्तक आहेत. माधुरीच्या दोघी बहीणी प्रसिद्धीपासून दूर असतात, पण त्यांनी नेहमीच माधुरीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं.  माधुरीने एकदा तिच्या दोन्ही बहिणींसोबतचा एक जुना फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती शाळेत तिच्या बहिणींसोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसली होती.

6 / 7
पती श्रीराम नेने  माधुरीने 1999 मध्ये अमेरिकेतील हृदयरोगतज्ज्ञ श्रीराम माधव नेने यांच्याशी लग्न केले. श्रीराम यांच्याशी तिचे अरेंज मॅरेज होते.  आज ते दोघेही आनंदाने वन जगत आहेत आणि श्रीराम नेहमीच माधुरीला प्रोत्साहन देताना दिसतात. माधुरीने अनेकदा श्रीराम यांच्यासोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

7 / 7
 मुलं अरिन आणि रियान  माधुरी दीक्षितला अरिन आणि रायन ही दोन मुले आहेत. मोठा मुलगा अरिन आणि धाकटा मुलगा रायन दोघांनाही प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडते. माधुरी तिच्या मुलांच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देते. तिच्या आयुष्यात व्यस्त असूनही, माधुरी आपल्या मुलांसाठी खास वेळ काढते.  दोघांचाही जन्म परदेशात झाला असला तरी ते भारतीय संस्कृतीशी जोडलेले आहेत. माधुरीच्या दोन्ही मुलांना त्यांच्या आईप्रमाणेच भारतीय संगीतही आवडतं.