कान्समधील लूकवरून ऐश्वर्या रायची खिल्ली उडवणाऱ्यांना माधुरी दीक्षितने सुनावलं; म्हणाली ‘कपडे अन् वय..’

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या रायच्या लूकवरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर आता माधुरीने उत्तर देत ट्रोलर्सना सुनावलं आहे. याआधी कंगना राणौत आणि तृप्ती डिमरी यांनीसुद्धा ऐश्वर्याची बाजू घेत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं होतं.

| Updated on: Jun 01, 2026 | 10:00 AM
1 / 5
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जोपर्यंत रेड कार्पेटवर येत नाही, तोपर्यंत जगप्रसिद्ध ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ परिपूर्ण वाटत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. यावर्षीही चाहते ऐश्वर्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ऐश्वर्या या अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात पोहोचली. यावेळी तिच्या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. मात्र काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं. याप्रकरणी आता माधुरी दीक्षितने ट्रोलर्सना सुनावलं आहे.

2 / 5
'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी म्हणाली, "लोकांनी चुका काढायला आज सुरुवात केली असं नाही, आधीही ते अशाच प्रकारे ट्रोल करायचे, फालतू कमेंट करायचे. फक्त इतकाच फरक आहे की तेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म नव्हता. आज सोशल मीडियाच्या रुपात त्यांना खुला मंच मिळाला आहे."

3 / 5
'देवदास'मधील सहअभिनेत्री ऐश्वर्या रायचा बचाव करताना यावेळी माधुरी पुढे म्हणाली, "ऐश्वर्या कोणी सर्वसामान्य स्टार नाही, तर तिचा एक वेगळा वारसा आहे. गेल्या 20 वर्षांपासून ती या फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाऊन जागतिक मंचावर भारताचं नाव मोठं करतेय. तिने नेहमीच संपूर्ण देशाला अभिमान वाटावं असंच काम केलं आहे. ती एक खरी ग्लोबल स्टार आहे."

4 / 5
"ऐश्वर्या रायसारख्या व्यक्तिमत्त्वाला कोणत्याही वजनकाट्यात, कपड्यांच्या आकाराने किंवा वयाच्या आकड्यांमध्ये मोजता येणार नाही. ती बाहेरून जितकी सुंदर आहे, तितकीच ती आतूनही सुंदर आहे. मी तिच्यासोबत काम केलं आहे आणि मला तिचा स्वभाव चांगला माहीत आहे. त्यामुळे लोकांनी सावधगिरीने बोलावं", अशा शब्दांत माधुरीने टीकाकारांना सुनावलं.

5 / 5
ट्रोलर्सवर आपला संताप व्यक्त करत माधुरीने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. तिने विचारलं, "जेव्हा लोक कोणाच्या दिसण्यावर अशा घाणेरड्या टिप्पण्या करतात, तेव्हा ते आजच्या तरुणांना कोणता संदेश देत असतात? आजच्या मुलांनी हे शिकायला हवं का की, एखाद्या व्यक्तीची किंमत फक्त त्याच्या दिसण्यावरून ठरते, त्याच्या कर्तृत्त्वावरून नाही? यामुळे समाजात खूप चुकीचा संदेश जातो."

Follow Us