
1 फेब्रुवारीला जॅकी श्रॉफ यांचा वाढदिवस पार पडला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

यात माधुरी दीक्षितनं केलेलं ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधलं. ‘Happy Birthday #JagguDadu My most favourite onscreen “Ramji” ’ असं कॅप्शन देत तिनं हा फोटो शेअर केला आहे.

राम लखन या चित्रपटाची आठवण काढत माधुरीनं जॅकी आवडते रामजी असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

माधुरी आणि जॅकीनं 90च्या दशकात बॉलिवूड गाजवलं अनेक चित्रपटांमधून त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना बघता आली.

‘खलनायक’, ‘राम लखन’, ‘वरदी’या सारख्या चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.

नुकतंच ‘राम लखन’ या चित्रपटाला 32 वर्ष पूर्ण झाले आहेत.