PHOTO | रुग्णांचा तडपून तडपून मृत्यू, नातेवाईकांची ऑक्सिजनच्या सिलिंडर्सवर झुंबड; देशात झोप उडवणारं दृश्य

| Updated on: Apr 22, 2021 | 12:50 AM

सध्या देशात आरोग्य व्यवस्था कोलमडली असून ऑक्सिजन सिलिंडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची झुंबड उडताना दिसत आहे.

1 / 6
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. रोज 2 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची नव्याने लागण होत आहे. कोरोनाचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या देशात आरोग्य व्यवस्था कोलमडली असून ऑक्सिजन सिलिंडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची झुंबड उडताना दिसत आहे.

2 / 6
फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी उपोयगी पडणाऱ्या कृत्रिम ऑक्सिजनची टंचाई भासू लागली आहे. ऑक्सिजनने भरलेले एक सिलिंडर मिळवायचे म्हणजे रुग्णाच्या नातेवाईकांना जीव धोक्यात घालून कसरत करावी लागत आहेत. ही परिस्थिती महाराष्ट्र तसेच दिल्ली, कानपूर या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

3 / 6
देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली असून येथे आरोग्य यंत्रणा कोलमडलीये. या परिस्थितीमुळं नवी दिल्लीमध्ये  लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा लॉकडाऊन 26 एप्रिलपर्यंत लागू असेल. वाढत्या रुग्णांमुळे दिल्लीमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. येथे नव्याने ऑक्सिजन भरुन आणण्यासाठी लोक धकडपडत आहेत.

4 / 6
नवी दिल्लीतल तुर्कमन गेटजवळ  रेसिडेन्स वेलफेअर असोशिएशनतर्फे ऑक्सिजनने भरलेल्या सिलिंडरचे वाटप होत असताना लोक अशा प्रकारे आपल्याजवळील रिकामे सिलिंडर घेऊन जात होते. फ्रिमध्ये सिलिंडर भरुन मिळत असल्यामुळे लोकांची अशी गडबड सुरु आहे.

5 / 6
उत्तर प्रदेशमध्ये तर कोरोनाची संसर्गीची स्थिती जास्तच विदारक आहे. येथे मृतांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी अपऱ्या पडत आहेत. शेकडो मृतदेह वेटिंगवर आहेत. राज्यात आरोग्य व्यवस्था तर पुरती कोलमडलीये.

6 / 6
येथे कोरोना रुग्ण वाढल्यामुळे ऑक्सिजनच्या सिलिंडरची मागणी वाढली आहे. रिकामे सिलिंडर परत करुन भरलेले सिलिंडर घेण्यासाठी कानपूरमध्ये अशा प्रकारे लोकांची झुंबड उडाली आहे. लोक अशा प्रकारे गर्दी करत आहेत.