Maharashtra Kesari Final Sikander Shaikh | हमालाचं पोरं महाराष्ट्र केसरी, सिकंदरने ‘हा’ टाकत शिवराजला दाखवलं अस्मान

Maharashtra Kesari 2023 Winner : मागील वर्षी हातातोंडाशी आलेला घास गेला, पण पोराने हार मानली नाही. जिद्द, मेहनत, चिकाटीच्या जोरावर त्याने परत सराव सुरू केला आणि यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला.

| Updated on: Nov 10, 2023 | 9:13 PM
1 / 5
महाराष्ट्र केसरीच्या ६६ व्या स्पर्धेमध्ये सिकंदर शेख याने विजय मिळवत मानाची गदा पटकावली आहे. फायनलमध्ये गतविजेत्या शिवराज राक्षेचा पराभव करत पठ्ठ्याने मैदान मारलं आहे.

2 / 5
पुण्यातील फुलगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये फायनल सामन्यात सिकंदरने शिवराज राक्षे याला चीतपट केलं. अवघ्या काही सेकंदामध्ये झोळी डाव टाकत सिकंदरने विजय मिळवला.

3 / 5
मागील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये शिवराजने महेंद्र गायकवाड याचा पराभव केलेला. तर सिकंदर शेख याचा सेमी फायनलमध्ये महेंद्रने पराभव केला होता.

4 / 5
सिकंदर शेख याने हार मानली नाही, मेहनत करत राहिला परत आखाड्यात उतरला आणि महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून गेला. मोहोळ तालुक्यतील या मल्लाने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय.

5 / 5
 सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मधला रहिवासी आहेत. गंगावेश तालमीच्या पठ्ठ्याने अखेर महाराष्ट्र केसरीवर नाव कोरत जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला आहे.