Parth Pawar-Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड, पार्थ पवार अचानक शिवतीर्थवर

Parth Pawar-Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड पहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांचे थोरले सुपूत्र पार्थ पवार आज अचानक शिवतीर्थवर आले होते.

| Updated on: Mar 30, 2026 | 12:41 PM
1 / 5
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड पहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांचे थोरले सुपूत्र पार्थ पवार आज अचानक शिवतीर्थवर आले होते. तिथे त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड पहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांचे थोरले सुपूत्र पार्थ पवार आज अचानक शिवतीर्थवर आले होते. तिथे त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

2 / 5

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी शिवतीर्थवर येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी संदर्भात ही भेट होती.

3 / 5

आज पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आपल्या कारमध्ये बसून तिथून निघून गेले. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे ही भेट का झाली? त्यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

4 / 5

पार्थ पवार यांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड होणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

5 / 5

अजित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्र सुनेत्रा पवार यांच्या हाती आहे. विधिमंडळात त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख आहेत. त्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us