कुठं घरं जलमय तर कुठं अनके गावांत ढगफुटी, राज्यात पावसाचा रुद्रावतार, नेमकी परिस्थिती काय?

पुणे, नाशिक तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसतोय. अनेक ठिकाणी गावांत पाणी शिरले आहे.

| Updated on: May 25, 2025 | 9:20 PM
1 / 7
नाशिकमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. सिन्नर तालुक्यातही मोठा पाऊस पडला आहे. सिन्नरसह तालुक्यातील अनेक गावात ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली आहे.

2 / 7
सिन्नर शहरातील अनेक सकल भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. तर कुंदेवाडी येथील देव नदीला पूर आला आहे.

3 / 7
पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील दौंड येथील स्वामी चिंचोली गावावर निसर्गाचा कहर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे गावात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

4 / 7
रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्कही तुटलाय. अनेक घरं पाण्यात पूर्णपणे बुडाली असून वेताळ वस्ती, मात्रे वस्ती, लक्ष्मी नगर हनुमान नगर या परिसरातील 12 घरं पाण्याखाली गेली आहेत.

5 / 7
या घटनेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. पावसाचा जोर असाच राहिला, तर आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

6 / 7
गुहागरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. धोपावेमधील गणेश नगरमध्ये ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तालुक्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे.

7 / 7
बारामतीच्या कंबळेश्वर गावात पाणी शिरलं आहे. जेसीबीने पाण्याला वाट मोकळी करून दिली जात आहे. कंबळेश्वर गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.