‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’च्या कलाकारांची वृद्धाश्रमात अनोखी दिवाळी; फराळ दिलं अन् खळखळून हसवलं

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमने आपल्या कलेच्या माध्यमातून समाजात आनंद पसरवण्याचा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माणुसकीचा संदेश देण्याचा हा अनोखा प्रयत्न केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत या टीमने केलेल्या कामगिरीचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

| Updated on: Oct 21, 2025 | 11:27 AM
1 / 5
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकारांनी यंदाची दिवाळी अत्यंत खास आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी केली आहे. नेहमीच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ही टीम आता दिवाळीचा आनंद गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईतील बोरिवली इथल्या सिटीझन वेलफेअर असोसिएशन या वृद्धाश्रमात पोहोचली.

2 / 5
यावेळी नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पुनरागमन करणारा ओंकार भोजने उपस्थित होता. सोबतच शिवाली परब, वनिता खरात हे कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक निर्माते सचिन मोटे देखील उपस्थित होते.

3 / 5
यावेळी सगळ्या कलाकारांनी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांसोबत वेळ घालवला. त्यांच्यासोबत फराळाचा आनंद देखील घेतला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखिल केली. टीव्हीवर आपल्या लाडक्या विनोदवीरांना ते नेहमीच पाहतात पण आता प्रत्यक्षात त्यांना पाहताना वृद्धाश्रमातील मंडळींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

4 / 5
अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबापासून दूर राहतात, अशा वेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमच्या आगमनाने त्यांना कुटुंबातील सदस्यांचा सहवास लाभल्यासारखं वाटलं. कलाकारांनी त्यांच्या आवडत्या स्किट्सबद्दल गप्पा मारल्या आणि त्यांच्याशी संवाद साधून ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं.

5 / 5
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अभिनेता ओंकार भोजने म्हणाला, "आम्ही रोज टीव्हीवर लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो, पण आज ज्येष्ठांसोबत प्रत्यक्ष दिवाळी साजरी करताना मिळालेला आनंद अवर्णनीय आहे. दिवाळी म्हणजे 'प्रकाश आणि आनंद पसरवणं', आणि आज आम्हाला तो खरा आनंद मिळाला."