चेन्नईला संजू सॅमसन मिळाला, धोनीचं काय काम? संघात नेमकं काय करणार?

कधीकाळचा भारताचा स्ट्रार क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा प्रमुख खेळाडू महेंद्रसिंह धोनी यावेळच्या आयपीएल हंगामात खेळणार की नाही, असे विचारले जात होते. याचे उत्तर आता सापडले आहे.

| Updated on: Nov 15, 2025 | 11:39 PM
1 / 5
आयपीएल 2026 च्या अगोदर चेन्नई सुपर किंग्ज या संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. या संघाने एकूण 11 खेळाडूंना रिलीज केले आहे. या संघात आता राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार, यष्टीरक्षक तसेच फलंदाज असलेल्या संजू सॅमसनची एन्ट्री झाली आहे.

2 / 5
संजू सॅमसन संघात आल्यानंतर आता 2026 साली महेंद्रसिंह धोनी क्रिकेट खेळणार की नाही, असे विचारले जात आहे. या प्रश्नाचेही उत्तर अखेर मिळाले आहे. महेंद्रसिंह धोनी आगामी आयपीएल सिझनमध्ये पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे.

3 / 5
धोनी सध्या 44 वर्षांचा आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनीदेखील धोनी आयपीएलच्या आगामी हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा भाग असेल, असे सांगितले होते. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना तो पुन्हा एकदा फलंदाजी करताना दिसणार आहे.

4 / 5
तर दुसरीकडे चेन्नई सुपरिकिंग्ज संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. चेन्नईच्या संघाता आता रविंद्र जडेजा नसेल. रचिन रविंद्र, डेवोन कॉन्वे, मशिथा पथिराने आणि सॅम करन या खेळाडूंनादेखील चेन्नई संघाने रिलीज केले आहे.

5 / 5
राहुल त्रिपाठी, कमलेषश नागरकोटी, शेख रशीद, सी आंद्रे सिद्धार्थ, विजय शंकर, दीपक हुड्डा या खेळाडूंनाही चेन्नई संघाने रिलीज केले आहे. त्यामुळे आगामी हंगामात चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी नेमकी कशी असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.