
आंतरराष्ट्रीय कार सुरक्षा रेटिंग एजन्सी ग्लोबल NCAP ने भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमधील सर्वात सुरक्षित कारची यादी अपडेट केली आहे. या एजन्सीने अलीकडेच चार मेड इन इंडिया कारची चाचणी केली आहे. एजन्सी हॅशटॅग #SaferCarsForIndia campaign मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 50 कारची क्रॅश चाचणी करण्यात आली आहे. महिंद्रा, टाटा, होंडा यांसारखे ब्रँड या सेगमेंटमध्ये आहेत. टाटा जॅझ कार देखील या सेगमेंटमध्ये आहे.

संग्रहीत छायाचित्र

Tata Punch: टाटा पंच एसयूव्ही या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टाटा पंचला पाच स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आले आहे, तर बालकांच्या रेटिंगसाठी 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. टाटाची ही तिसरी कार आहे, जिने सुरक्षिततेच्या बाबतीत बरीच प्रसिध्दी मिळवली आहे.

Mahindra XUV300: Mahindra XUV300 ही NCAP चाचणी य़शस्वी करणारी महिंद्राची पहिली कार आहे. सेफर चॉईस अवॉर्ड मिळालेली ही पहिली कार आहे. या कारला प्रौढांसाठी 5 स्टार रेटिंग मिळाले आहे, तर लहान मुलांसाठी 4 स्टार सुरक्षा रेटिंग आहे. ही एसयूव्ही सेगमेंटची कार आहे.

Tata Altroz: Tata Altroz ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. ग्लोबल NCAP वर क्रॅश चाचणी दरम्यान प्रौढांसाठी 5 स्टार रेटिंग दिले गेले आहे, तर मुलांसाठी 3 स्टार रेटिंग दिले गेले आहे. Tata Altroz ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे.

Tata Nexon: टाटाची टॉप-5 मध्ये असलेली ही तिसरी कार आहे जिने सुरक्षिततेच्या बाबतीत आपले स्थान निर्माण केले आहे. प्रौढ सुरक्षा रेटिंगला 5 स्टार मिळाले आहेत, तर मुलांच्या सुरक्षेला 3 स्टार मिळाले आहेत. Nexon मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज उपलब्ध आहेत.