
झी मराठी वाहिनीवरील 'पारू' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत पारूचं आयुष्य बदलणार आहे. किर्लोस्करांच्या बिझनेसची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून पारू आजवर उत्तम सहकार्य करत आली आहे.

पारुसाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे कारण किर्लोस्करांच्या बिझनेससाठी एका भव्य जाहिरातीचं चित्रीकरण होत आहे. या चित्रीकरणासाठी मंडप सजला आहे. पारूने लग्नाचा जोड घातला आहे. नवरदेवाच्या पोशाखात आदित्य तयार आहे.

भटजींनी मंत्र सुरु केले आणि लग्नविधी सुरू झाले. आदित्यने पारूच्या गळ्यात मंगळसूत्रही घातलं आहे. पण विवाह संपन्न झाला असं बोलायच्याऐवजी दिग्दर्शकानी शॉट कट केला. पारूचे दागिने काढले गेले, गळ्यातला हार देखील काढला.

लाईट्स ऑफ केल्या गेल्या आणि पारूच्या आयुष्यात अंधार झाला. तिला काही काळेनासं झालं. पारूने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढू नाही दिलं. कारण तिच्यासाठी हे नातं जन्मो जन्मांतरासाठी बांधलं गेलं आहे.

पारूच्या आयुष्यात क्षणात नियतीचे फासे फिरले आणि दुःखाचे काटे तिच्या मनात रुतले गेले. आदित्य आणि अहिल्यादेवी समोर पारू जेव्हा तिचं हे सत्य ठेवेल, तेव्हा काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.