‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा ट्विस्ट; भूमिकांची होणार अदलाबदल, उत्सुकता शिगेला

अर्जुन-सायलीचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना 'ठरलं तर मग' या मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे. ही मालिका दररोज रात्री 8.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Feb 11, 2026 | 1:41 PM
1 / 5
स्टार प्रवाह वाहिनीच्या 'ठरलं तर मग' मालिकेत लवकरच प्रेक्षकांना एक नवं वळण अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्राची लाडकी जोडी अर्थातच अर्जुन-सायलीच्या भूमिकांची लवकरच अदलाबदली होणार आहे.

2 / 5
ऑफिसच्या कामाप्रमाणेच घरात दिवसभर राबणाऱ्या गृहिणीच्या कष्टांची दखल देखील घ्यायला हवी हेच एकमेकांना पटवून देण्याच्या हेतूने अर्जुन-सायलीने एकमेकांची कामं करण्याचा निश्चय केला आहे.

3 / 5
सायलीच्या कामाची जबाबदारी घेतलेला अर्जुन यापुढे स्वयंपाकघर आणि संपूर्ण घराची जबाबदारी खांदयावर घेणार आहे. तर सायली अर्जुनच्या भूमिकेत शिरून ऑफिस आणि कोर्टाच्या कामांची जबाबदारी स्वीकारणार आहे.

4 / 5
दोघांसाठीही हा अनुभव नवा असला तरी अनोखी शिकवण देणारा ठरणार आहे. नात्यातील समज, आदर आणि समानतेचं महत्त्व अधोरेखित करणारं मालिकेतलं हे वळण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

5 / 5
अर्जुन-सायलीसाठी व्हॅलेंटाइन डेसुद्धा खास ठरणार आहे. पहिलं काँट्रॅक्ट मॅरेज आणि एकमेकांच्या संमतीने झालेलं पहिलं लग्न 14 फेब्रुवारीलाच झालं होतं. त्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाइन डे बदलेल्या भूमिकांसोबत ते साजरा करणार आहेत.