
मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याचे बघायला मिळतंय. याचा फटका आता बिग बॉस 19 च्या निर्मात्यांना देखील बसलाय.

बिग बॉस 19 चे शूटिंग पावसामुळे थांबवण्यात आलंय. बिग बॉसच्या घरात काही पत्रकार जाणार होते आणि त्याची शूटिंग होती.

मुंबईतील पावसामुळे ही शूटिंग होऊ शकली नाहीये. पावसाचा चांगलाच मोठा फटका बसला असून सेटवर देखील पाणीच पाणी झाले आहे.

बिग बॉस सीजन 19 ची जोरदार तयारी सुरू असून सीजनला लवकर सुरूवात होणार आहे. अनेक प्रसिद्ध चेहरे घरात धमाका करताना दिसणार आहेत.

क्रिकेटर संजय बांगर यांची लेक अनाया ही देखील बिग बॉसच्या घरात येणार आहे. तिने काही क्रिकेटरर्सवर गंभीर आरोप केली होती.