
अनेकजण मखाना खाण्यावर अधिक भर देतात. मखाना खाल्ल्याने लगेचच पोट भरत असल्याने वजन कमी करणाऱ्या लोकांच्या आहारात मखाना मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो.

विशेष म्हणजे मखान्यात फायबर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे पोट लवकर भरते आणि वजनही कमी होते. मात्र, अनेकजण मखान्यााऐवजी शेंगदाणे खातात.

मखाना आणि फायदेशीर की शेंगदाणे असा प्रश्न अनेकांना पडतो. शेंगदाण्यापेक्षा आपल्या आरोग्यासाठी मखाना हा अधिक फायदेशीर ठरतो. त्यामध्ये अनेक पोषक घटक आहेत.

शिवाय शेंगदाण्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. मखान्याने वजनही कमी होण्यास मदत होते. कायम लक्षात ठेवा की, मखाना अगोदर भाजून घ्या आणि मग खा.

मखाना हेल्दी असून पचन्यासाठीही सोप्पा आहे. मखाना लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.