
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायका हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायका हिच्या वडिलांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

मलायका हिने वडिलांच्या निधनानंतर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्या पोस्टमध्ये मलायका हिने अनिल मेहता असा वडिलांच्या नावाचा उल्लेख केला. दुसरीकडे मलायकाच्या वडिलांचे नाव अनिल अरोरा असल्याचे सांगितले जाते.

अनिल मेहता हे मलायका अरोरा हिचे सावत्र वडील असल्याची चर्चा आहे. हेच नाही तर हैराण करणारे म्हणजे मलायका अरोरा आणि अनिल मेहता यांच्या वयात फक्त 12 वर्षांचे अंतर आहे. ज्यानंतरच विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

मुलीमध्ये आणि वडिलांमध्ये फक्त बारा वर्षांचेच कसे अंतर हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. अनिल मेहता हे मलायकाचे सावत्रच वडील असल्याचा दावा हा केला जातोय. मात्र, यावर अजून काही खुलासा मलायका किंवा तिच्या कुटुंबाकडून करण्यात आला नाही.

वडील अनिल मेहता यांच्या निधनानंतर मलायका अरोरा आणि तिची बहीण पूर्णपणे तुटल्याचे बघायला मिळतंय. वडिलांनी ज्यावेळी आत्महत्या केली, त्यावेळी मलायका ही पुण्यात होती.