
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या अदांनी चाहत्यांच्या मनाला भुरळ घालत असते. मलायका तिच्या ग्लॅमरस स्टाईल आणि खास लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. प्रत्येकजण या अभिनेत्रीच्या फिटनेसचा वेडा आहे. मलायका आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे अधिक चर्चेत आहे. त्याच वेळी, आता मलायकाने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे

मलायका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. अभिनेत्री तिच्या फोटोंनी आणि व्हिडीओंनी आपल्या चाहत्यांना भुरळ घालत असते. आता मलायकाने तिचा कोरोना लस घेतानाचा फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अलीकडेच मलायकाने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ती कोरोना लसीचा पहिला डोस घेताना दिसत आहे. एक आरोग्य कर्मचारी मलायकाला कोरोना लस देताना दिसत आहे.

यावेळीसुद्धा मलायका अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती. ती व्हाईट कलरच्या टॉप आणि रेड मास्क परिधान केलेला दिसत आहे. फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले की, ‘आज मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, कारण आपण पूर्णपणे #wereinthist! योद्धांनो, या #WarAgainstVirus मिळून जिंकूया. लवकरच लस घेण्यास विसरू नका! आणि हो मी लस घेण्यास पात्र आहे!

मलायका 47 वर्षांची आहेत आणि 1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या वरील सर्व लोकांना लसीकरण सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत अजिबात उशीर न करता मलायकाने कोरोन लस घेतली आहे. मलायका अरोराला देखील कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने शक्य ती सगळी सावधगिरी बाळगत कोरोन लस घेतली आहे.