Premanand Maharaj: सर्वकाही विकूनही मनुष्य एक गोष्ट खरेदी करु शकत नाही, काय म्हणाले प्रेमानंद महाराज ?

वृदांवनचे प्रेमानंद महाराज यांची प्रवचने अनेक जण ऐकत असतात. त्यांचा चाहता वर्ग देश आणि विदेशात आहे. त्यांनी जीवनातील एका महत्वाच्या गोष्टीबद्दल आपले अमूल्य विचार मांडले आहेत.

Updated on: Nov 22, 2025 | 7:51 PM
1 / 5
 प्रेमानंद महाराज यांची प्रवचने आज वृदांवनच्या आश्रमापुरती मर्यादित न राहाता सर्व जगात प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक त्यांची प्रवचने ऐकत असतात. प्रेमानंद महाराज म्हणतात इश्वराची प्राप्ती करण्याच एकमात्र मार्ग आहे त्याच्या नामस्मरणात दंग होऊन जाणे.

2 / 5
प्रेमानंद महाराज सांगतात, 'जे लोक नामजप करतात ते ईश्वराच्या चरणात जातात, त्यांचा निश्चित उद्धार होतो. अलिकडेच प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्यांनी सांगितले की मनुष्य आपले सर्वकाही विकूनही एक गोष्ट विकत घेऊ शकत नाही.'...चला तर पाहूयात ही गोष्ट कोणती आहे.

3 / 5
वृंदावनच्या लोकांना संबोधित करताना प्रेमानंद म्हणाले की,' मनुष्याचा श्वास खूपच किमती आहे. जर एखादा व्यक्तीने ५० वर्षांपर्यंत कमावलेला सारा पैसा, घर, संपत्ती विकली तर तो अतिरिक्त श्वास खरेदी करु शकत नाही. त्यामुळे सर्वाना एक विनंती आहे की प्रत्येक श्वासात राधा नावाचा जप करा. यात कोणतीही मेहनत लागत नाही. एक रुपयाही लागत नाही.

4 / 5
प्रेमानंद महाराज पुढे म्हणतात की शरीर त्यागल्यानंतर मनुष्य काहीच सोबत घेऊन जाऊ शकत नाही. श्वास थांबताच, शरीर, घर, स्री, पुत्र, कुटुंब आणि प्रत्येक भौतिक सुख येथेच रहाते. यानंतर मनुष्याला पाप-पुण्याच्या आधारे पशु-पक्षी वा कोणा दुसऱ्या योनीत जन्म मिळतो. हा जन्म कुठे आणि कोणत्या योनीत होईल, हे कोणालाही माहिती नसते. यासाठी आपला प्रत्येक श्वास देवाच्या नामस्मरणात घालवा. जगात असे अनेक लोक आहेत. ज्यांनी राधा नाम स्वीकारुन वाईट आचरणाला त्यागले आहे.

5 / 5
प्रेमानंद महाराज म्हणतात की राधा नाव जपल्याने तुमचे परम कल्याण होईल. जर तुम्हाला कोणा कारणाने राधा नाम प्रिय नसेल तर तुमच्या इच्छेनुसार राम, कृष्ण, हरि वा कोणा अन्य देवी-देवतांचे नाम स्मरण करु शकता. जे लोक इश्वराचे नाव घेऊन पुढे जातात त्यांचे जीवन सार्थक होते.