Mangal Gochar 2025: तुळ राशीत मंगळाचे गोचर, या 4 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर

Mangal Gochar 2025: 13 सप्टेंबर 2025 रोजी मंगळाचे तुळ राशीत गोचर होणार आहे. या गोचरानंतर काही राशींचा वाईट काळ सुरु होणार आहे. त्यांच्यावर अक्षरश: संकटांचा डोंगर कोसळणार आहे. आता या राशी कोणत्या चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 13, 2025 | 4:50 PM
1 / 8
शनिवार, 13 सप्टेंबर 2025 रोजी मंगळ कन्या राशीतील प्रवास पूर्ण करून तुळ राशीत प्रवेश करेल. ही शुक्राची रास आहे. मंगळ 13 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी तुळ राशीत प्रवेश करेल आणि 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत याच राशीत राहणार आहे.

2 / 8
दिग्रपंचागानुसार, ग्रहांचे सेनापती मंगळ हे मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामी आहेत. तसेच तुळ राशीचा स्वामित्व शुक्राकडे आहे. मंगळाची प्रवृत्ती उग्र आहे, तर शुक्राची ऊर्जा संतुलित आहे. त्यामुळे तुळ राशीत मंगळाचे असणे प्रतिकूल मानले जाते.

3 / 8
मंगळजोपर्यंत तुळ राशीत राहील, तोपर्यंत काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. कारण तुळ राशीत मंगळाचे हे गोचर अनेक राशींसाठी संकट घेऊन येणारे आहे. जाणून घ्या कोणत्या राशींवर मंगळ गोचराचा प्रतिकूल प्रभाव पडेल.

4 / 8
मेष राशी - मंगळाचे गोचर तुमच्या सातव्या भावावर परिणाम करेल, ज्यामुळे वैवाहिक नात्यात तणाव, जोडीदारासोबत मतभेद आणि मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात, त्यांच्यावरही मंगळ गोचराचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो.

5 / 8
कर्क राशी - मंगळ तुमच्या राशीपासून चौथ्या भावात गोचर करेल, ज्यामुळे मानसिक त्रास वाढेल आणि कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. विशेषतः आईसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात कोणाशीही वादविवाद टाळण्याची गरज आहे.

6 / 8
कुंभ राशी - मंगळाचे गोचर कुंभ राशीच्या नवव्या भावावर परिणाम करेल, ज्यामुळे तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळणार नाही. आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते आणि मानसिक त्रासात वाढ होईल.

7 / 8
तुळ राशी - मंगळ तुमच्या राशीच्या लग्न म्हणजेच पहिल्या भावात गोचर करेल, ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. आरोग्य आणि नातेसंबंधांवरही परिणाम होईल. या काळात मानसिक आणि शारीरिक त्रास वाढू शकतो.

8 / 8
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)