वयाच्या 55 व्या वर्षी कशी दिसतेय मनीषा कोईराला? काही फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या 55 व्या वर्षी देखील मनिषा प्रचंड फिट आहे. सध्या सर्वत्र फक्ता आणि फक्त मनिशा हिच्या काही फोटोंची चर्चा रंगील आहे.

अभिनेत्री मनिषा कोईराला हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता मनिषा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्ता आणि फक्त मनिशा हिच्या काही फोटोंची चर्चा रंगील आहे.

मोकळे केस आणि साडीत अभिनेत्रीने फोटो शूट केलं आहे. वयाच्या 55 व्या वर्षी देखील मनिषा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अनेकांना अभिनेत्रीचा हा हटके लूक आवडलेला आहे. शिवाय नेटकऱ्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

मनिषा आता रुपेरी पडद्यावर सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम सक्रिय असते. अनेक वर्षांनंतर हीरामंडी वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आणि अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सीरिजमध्ये मनिषा हिची एक वेगळी बाजू चाहत्यांना पाहायला मिळाली.

अभिनेत्री मनिषा कोईराला स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर होती. पण 'हीरामंडी' मुळे चर्चेत होती. आता देखील चाहते 'हीरामंडी' सीरिजच्या दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत.

मनिषा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात रहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते मनिषाच्या प्रत्येक फोटोवर लईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.