एक मराठा, लाख मराठा! मुंबईत भगवं वादळ धडकलं, ऐतिहासिक गर्दीचे फोटो एकदा पाहा

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे आंदोलन मुंबईत जोरदार सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी ते आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. हा उपोषण आंदोलन मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न निर्माण केला आहे

| Updated on: Aug 29, 2025 | 7:04 PM
1 / 8
एक मराठा, लाख मराठा! मुंबईत भगवं वादळ धडकलं, ऐतिहासिक गर्दीचे फोटो एकदा पाहा

2 / 8
आझाद मैदानात पोहोचताच त्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

3 / 8
मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल झाल्यामुळे अनेक भागांमध्ये गर्दी झाली आहे. विशेषतः चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशन परिसर आंदोलकांनी भरून गेला आहे.

4 / 8
पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक आंदोलकांनी चर्चगेट स्टेशनच्या बोगद्यात आसरा घेतला आहे, तर काहीजण CSMT स्टेशन परिसरात थांबले आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

5 / 8
मराठा आंदोलनामुळे शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. माझगाव फ्रीवे आणि मंत्रालय परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक लोक त्यांच्या वाहनांमधून उतरून पायी चालत जात आहेत.

6 / 8
हे आंदोलन सुरू असतानाच अनेक आंदोलक आता त्यांच्या वाहनांकडे परतीच्या प्रवासाला लागले आहेत. नवी मुंबई मार्गे आलेल्या आंदोलकांची वाहने गोवंडी आणि आसपासच्या परिसरात लावण्यात आली आहेत. वाहनतळावर पोहोचण्यासाठी आंदोलक हार्बर रेल्वेचा वापर करत आहेत.

7 / 8
या आंदोलनावर राज्य सरकारचीही नजर आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांच्या मागण्यांचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर उपसमितीची बैठक घेतली जाईल. तसेच, हैदराबाद गॅझेटबाबतचा अभ्यासही सुरू असून त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

8 / 8
सुरुवातीला या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी देण्यात आली होती, परंतु नंतर ती आणखी एका दिवसासाठी वाढवण्यात आली आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे, त्यामुळे मुंबईतील तणावपूर्ण वातावरण कायम आहे.