
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आता मुंबईकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो मराठा आंदोलक आहेत. या आंदोलकांच्या डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे आहेत.

रस्त्याने चालत असताना हे मराठा आंदोलक आरक्षण मिळावे, अशा घोषणा देताना दिसत आहेत. दुसरीकडे सरकारनेही जरांगे यांना मुंबईत येण्यास परवानगी दिल्यामुळे आता त्यांचे आझाद मैदानात आंदोलन होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

जरांगे मुंबईला निघाले असून त्यांच्याोसबत असलेल्या जतनेचे काही फोटो समोर आले आहेत. त्यांच्या या ताफ्यात अनेक गाड्या दिसत असून असंख्य लोक दिसत आहेत. हे सर्वजण जरांगे यांच्या कारसोबत मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.

जरांगे यांना अगोदर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली होती. आता मात्र त्यांना सरकारने एकाद दिवसासाठी आंदोलन करता येईल, असे सांगितले आहे. मनोज जरांगे मात्र बेमुदत आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे आता काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जरांगे यांना फक्त एका दिवसासाठी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच आझाद मैदानात आंदोलन करता येणार आहे. आता प्रत्यक्ष 29 ऑगस्ट रोजी नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.