
मालदीवमध्ये सगळ्यांनी मस्त धमाल केली त्यासोबतच माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसुद्धा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला पोहोचली होती. मानुषीनं समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

मानुषीच्या मालदीवमधील फोटोवर तिचे चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एकानं तर तिचा हा कातिलाना अंदाज पाहून 'एक काम करा, आम्हाला मारुन टाका' अशी कमेंट केली.

मानुषी तिच्या फिटनेसवर खास लक्ष देते. ती नियमित योगा करते आणि महत्वाचं म्हणजे जेवणावर विशेष लक्ष देते.

सध्या मानुषी स्वत:च्या घराच्या टेरेसवर परसबाग तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. तिच्या विचारांनुसार हे करणं पर्यावरणासाठी उपयुक्त ठरू शकतं.

मानुषी 'पृथ्वीराज'या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.