प्राजक्ता माळी लग्न कधी करणार? अखेर सोडलं मौन, म्हणाली…
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकांना पडतो. नुकताच तिने या प्रश्नावर मौन सोडलं आहे. चला जाणून घेऊया...

प्राजक्ता माळी
Image Credit source: Tv9 Network
- मराठी चित्रपट आणि मालिकांच्या विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच लाइमलाइटमध्ये. कधी आपल्या अभिनयासाठी तर कधी विनम्र स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी प्राजक्ता अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रातही सक्रिय झाली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग असल्याने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा नेहमीच होत असते. विशेषतः ती कधी लग्न करणार, याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असते.
- अशातच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन घेतले. यावेळी एका चाहत्याने तिला नेहमीचा प्रश्न विचारला “लग्न कधी करणार?” यावर प्राजक्ता माळीने सडेतोड आणि मजेदार उत्तर दिले.
- प्राजक्ता म्हणाली, “हा माझ्या आई-वडिलांचा प्रश्न आहे, तुझा नाही.” तिने दिलेले उत्तर पाहून अनेकांना असे वाटत आहे की प्राजक्ता आता लग्न करणार आहे की नाही.
- दुसऱ्या एका चाहत्याने तिच्या विनम्रतेबद्दल विचारले असता प्राजक्ताने दिलेले उत्तर देखील चर्चेचा विषय ठरले. ती म्हणाली, “आयुष्याने दिलेले फटके.” याशिवाय, एका चाहत्याने तिला विचारले की, गश्मीर महाजनी, अंकुश चौधरी आणि ललित प्रभाकर यांच्यातील तुझा आवडता सहकलाकार कोण? यावर प्राजक्ताने दिलेले उत्तरही लक्ष वेधून घेणारे होते. ती म्हणाली, “तुम्हीच ओळखा!”
- कामाच्या बाबतीत प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका तेलुगु दिग्दर्शकासोबत पाठमोरा फोटो शेअर करत “काहीतरी शिजतंय…” असे कॅप्शन दिले होते. यामुळे तिच्या नवीन प्रोजेक्टबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us