
रिंकू हिला 'लग्न कधी करणार?' असं अनेक चाहते विचारत असतात. तेव्हा मुलाखतीच्या माध्यमातून अभिनेत्री म्हणाली, 'मी अद्याप जोडीदार म्हणून कोणाला शोधलं नाही. मला तसा मुलगा भेटलाच नाही. भेटल्यानंतर लग्न करेल...'

'आई - बाबा माझ्यासाठी मुलगा शोधतील... त्यांना आवडलेला मुलगा मला सुद्धा आवडेल आणि तेव्हाच मी लग्न करेल...' असं रिंगू म्हणाली. सध्या सर्वत्र रिंकू हिच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

पुढे अभिनेत्री म्हणाली, 'मला जर कोणी आवडलं तरी मी आई - बाबांना नक्की सांगेल हाच तो मुलगा... तोपर्यंत कोणी नाही भेटला तर, आई - बाबा शोधतील... त्या मुलासोबत मी लग्न करेल...' असं देखील रिंकू म्हणाली.

एवढंच नाही तर, तू फिल्मी आहेस का? असं देखील अभिनेत्रीला विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, 'मी अजिबात फिल्मी मुलगी नाही. मी खूप भावनिक, अतिविचारी मुलगी आहे. जशा अन्य मुली महिला असतात तशीच मी देखील आहे...'

रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.