Sai Tamhankar : लग्नानंतर फक्त दोनच वर्षात घटस्फोट; सई ताम्हणकरने का घेतला होता हा निर्णय?
सई ताम्हणकर सध्या तिच्या अडकित्ता या सिनेमामुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर खूप फोटोशूट शेअर केले आहेत. दरम्यान, तिच्या ग्लॅमरस लूकसोबत तिचे वैयक्तित आयुष्यही अनेकदा चर्चेत असते.

सई ताम्हणकर सध्या तिच्या अडकित्ता या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण एरवीही सई नेहमी तिच्या स्टाईल आणि ग्लॅम लुक्समुळे लक्ष वेधून घेते. तिला ओळखणार नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात मिळणार नाही. कारण सईच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.
सई ताम्हणकरच्या सौंदर्यालाही अजिबातच तोड नाही. ती खूप सुंदर दिसते. इन्स्टावर तिने फोटो शेअर केले की काहीच क्षणात तिला लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळतात.
सईने नेहमी तिचे नवे फोटोशूट इन्स्टाग्रामवरुन शेअर करत राहते. यावेळी तिने काही तिच्या अडकित्ता या सिनेमातील लूकचेही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये तिने अगदी साधी साडी नेसली आहे. हा लूक सिनेमातील असल्याने त्या भूमिकेप्रमाणे तिने ब्लाऊज व साडी नेसली आहे. तिची वेणी साधारण आहे, गळ्यात मंगळसूत्र असून हातात बांगड्याही आहेत.
दरम्यान सईचं लग्न झालेलं, तिने घटस्फोट घेतला आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? सई ताम्हणकरने अमेय गोसावी यांच्याबरोबर २०१३ मध्ये लग्न केलं होतं.
त्यानंतर केवळ दोन वर्षांनीच म्हणजेच २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटाचे नेमके कारण त्यांनी उघडपणे सांगितले नव्हते, पण त्यांनी हे नाते समजूतदारपणे संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते.
घटस्फोटावर बोलताना एका मुलाखतीत सई म्हणाली होती, “काहीवेळा गोष्टी जुळून येत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही.” (सर्व फोटो साभार- सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम)