
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान ओळखली जाते. तिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता तेजश्रीची संपत्ती किती? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

तेजश्री ही व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत राहिला आहे. लग्नाच्या वर्षभरातच तेजश्रीने घटस्फोट घेतला. पण या सगळ्यात ती खचून न जाता पुन्हा हिंमतीने उभी राहिली. आज ती इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तेजश्रीने होणार सून मी या घरची या मालिकेत काम करत प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेत ती शशांक केतकरसोबत दिसली होती. मालिका सुरु असतानाच त्यांनी लग्न केले होते. मात्र, वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर तेजश्री प्रेमाची गोष्ट या मालिकेत दिसली. या मालिकेतील तिची मुक्ता ही भूमिका विशेष गाजली. पण मध्येच तेजश्रीने ही मालिका सोडली. त्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

आता तेजश्री वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या तेजश्रीकडे एकूण संपत्ती किती असा प्रश्न अनेकांना पडतो. रिपब्लिक वर्ल्डच्या वृत्तानुसार तिच्याकडे एकूण 20 ते 30 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.