Tejashree Pradhan: पहिल्या घटस्फोटानंतर तेजश्रीला का करायचंय दुसरं लग्न? प्रेमाची व्याख्या सांगत म्हणाली…

Tejashree Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण गेल्या काही दिवसांपासून तेजश्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चे असते. आता तेजश्रीने दुसरं लग्न करणार असं सांगत प्रेमाची व्याख्या सांगितली आहे.

| Updated on: Sep 18, 2026 | 8:26 AM
1 / 5
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत लग्न केलं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर तेजश्री आजही एकटीच आयुष्य जगत आहे. तर शशांक याने दुसरा संसार थाटला आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत लग्न केलं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर तेजश्री आजही एकटीच आयुष्य जगत आहे. तर शशांक याने दुसरा संसार थाटला आहे.

2 / 5

दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तेजश्री हिने दुसरं लग्न आणि तिच्यासाठी असलेली प्रेमाची व्याख्या सांगितंली आहे. दुसऱ्यांदा प्रेमात पडणार का? असा प्रश्न तेजश्री हिला विचारण्यात आला.

3 / 5

दुसऱ्यांदा प्रेमात पडणार का? यावर होकार देत तेजश्री म्हणाली, 'मला तर प्रेमात पडायला आवडेल, माझं लग्न व्हावं हे तर माझ्या जवळच्या मित्रमंडळींचं स्वप्न आहे...'

4 / 5

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? यावर तेजश्री म्हणाली, 'काम संपवून आपल्याला घरी जाण्याचं मोटिव्ह मिळालं पाहिजे इतका जवळचा आपला माणूस...', असं देखील तेजश्री म्हणाली.

5 / 5

तेजश्री हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने स्वतःला एका ओळखीपूरतं मर्यादित ठेवलं नाही. तेजश्री आयुष्यात आलेल्या अनुभवांबद्दल देखील खूप काही बोलत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us