Urmila Kanetkar: I’M Mad… उर्मिला कानेटकरच्या लूकने वेधले लक्ष, सोशल मीडियावर चर्चा
Urmila Kanetkar: सध्या सोशल मीडियावर उर्मिला कानेटकचे फोटो चर्चेत आहेत. तिने शेअर केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर. ती गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. सध्या उर्मिलाचे काही फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
उर्मिलाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटलवर नुकताच नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील तिचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.
उर्मिलाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पांढरा रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. तसेच त्यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. तिच्या क्रॉप टॉपवर जे काही लिहिले आहे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
उर्मिलाच्या क्रॉप टॉपवर, 'Not ONLY AM I PERFECY, I'M Mad Too' असे लिहिले आहे. उर्मिलाचा हा हॉट लूक पाहून अनेकांनी कौतुक केले आहे. तसेच तिच्या या फोटोंची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
उर्मिला कानेकटर ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने आदिनाथ कोठारेला घटस्फोट देत दिल्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली. उर्मिलाने सोशल मीडियावरील नावातही बदल केला. तिने कोठारे हे नाव काढून पुन्हा कानेटकर लिहिले.