‘दे धक्का’मधील सायली गायब झाली तरी कुठे? बघा कशी दिसते, फोटोत ओळखूच शकणार नाही

'दे धक्का' सिनेमातील डायलॉग आणि काही सीन आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. सिनेमातील प्रत्येक कलाकाराने उत्तम भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण सिनेमात सायली ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीवर सर्वांच्या नजरा येऊन थांबल्या. आता ती सायली झगमगत्या विश्वापासून दूर आहे. आता तिला पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही.

| Updated on: Sep 24, 2026 | 8:07 AM
1 / 6
सांगायचं झालं तर, 'दे धक्का' सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली. सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. पण सायली या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

सांगायचं झालं तर, 'दे धक्का' सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली. सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. पण सायली या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

2 / 6

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दे धक्का' सिनेमात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम आणि मेधा मांजरेकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. तर सक्षम कुलकर्णी आमि गौरी वैद्य यांनी बाल कलाकारांची भूमिका साकारली.

3 / 6

सिनेमात गौरी हिने सायली या मुलीची भूमिका साकारली होती. तर तिच्या नृत्य कौशल्यांने सर्वांच्या मनावर राज्य केलं. 'उगवली शुक्राची चांदणी' हे गाणं चांगलंच गाजलं.. आजही तिच्या नृत्य कौशल्याची कौतुक होत आहे.

4 / 6

आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, गौरी आता नेमकं करतेय तरी काय? तर गौरी हिने आता अभिनयातून ब्रेक घेतला असून, तिने सध्या शिक्षणावर लक्ष केंद्रिक केलं आहे. आता तिला पाहिल्यानंतर तुम्ही ओळखू देखील शकणार नाही.

5 / 6

समोर आलेल्या माहितीनुसार, गौरी हिने 'डी. जी. रुपारेल' महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग अँड कॉम्पूटर टेक्नॉलॉजी मध्ये पदवी घेतली आहे.

6 / 6

गौरी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 'दे धक्का' सिनेमानंतर तिने 'शिक्षणाचा आयता घो' या सिनेमात दिसली. आता गौरी सोशल मीडियावर देखील फारशी सक्रिय नसते. आता गौरी हिने झगमगत्या विश्वाला रामराम ठोकला असून शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us