
जीवनातील ध्येये काय आहेत? - प्रत्येकाच्या जीवनातील ध्येये वेगवेगळी असतात. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न नक्कीच जोडीदाराला विचारायला हवा, जर दोघांची ध्येये जुळत असतील तर नाते अधिक घट्ट होईल.

कुटुंब नियोजन - लग्नानंतर अनेक जोडप्यांमध्ये मुले कधी जन्माला घालायची यावरून वाद निर्माण होतो. त्यामुळे लग्नापूर्वीच कधी आणि किती मुले हवी आहेत? याबाबत चर्चा करणे योग्य राहील.

वर्क-लाईफ बॅलन्स - सध्या जवळपास सर्वच जोडपी काम करत आहेत. त्यामुळे तुमचा जोडीदार कुटुंब आणि कामाला किती प्राधान्य देतो हे जाणून घेणे अधिक चांगले राहील.

पैशांबाबत विचार - अनेक जोडप्यांच्या नात्यात आर्थिक कारणांमुळे समस्या निर्माण होतात. त्यामुळे नात्यात प्रेम जितके महत्त्वाचे आहे तितकेच आर्थिक समज देखील तितकेच महत्त्वाचे आहे. याबाबत नक्की प्रश्न विचारा.

आरोग्याशी संबंधित प्रश्न - खराब जीवनशैलीमुळे अनेकांना तरूणपणी गंभीर आजार झाले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारले पाहिजेत. यामुळे तुमचे भविष्य सुकर होईल.