
लग्नासारख्या पवित्र नात्याचा काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या नावाखाली ठगी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा वाशिम पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

रिसोड पोलिसांनी या टोळीतील तीन महिला व एक पुरुषाला अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 44 हजार रुपयांचे दागिने आणि तब्बल 1लाख 25 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

ही टोळी अत्यंत शिताफीने आधी मुलगी दाखवत असे. त्यानंतर पारंपरिक रीतीरिवाजांनुसार लग्न लावून देत असे. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी घरातील सोनं व रोख रक्कम घेऊन फरार होत असे.

त्यामुळे पीडित कुटुंब आर्थिक व सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील अनेक कुटुंबांना या टोळीने अशाच पद्धतीने फसवल्याचे समोर आले आहे.रिसोड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत कारवाई केली.

त्यात आरोपींना रंगेहात पकडण्यात यश आले. तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून दागिने व रोकड जप्त करण्यात आली. असून प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.