अन् 2 दिवसांनी फाझिला जबीनचा मृतदेह बाहेर काढला, एक व्हिडीओ समोर येताच खळबळ; त्या मृत्यूचं गूढ काय?

अमरावतीत एक खळबळ घटना घडली आहे. तेथे एका विवाहित तरुणीचा मृतदेह दोन दिवसांनी कबरीतून बाहेर काढण्यात आला आहे. हे काम करत असताना परिसरात तणावपूर्ण शांतता होती.

| Updated on: May 17, 2026 | 7:10 PM
1 / 5
अमरावती : दोन दिवसांनी कब्रस्तानातून तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. माझ्या बहिणीची हत्या झाली आहे. सासरकडील मंडळींनीच ही हत्या घडवून आणली आहे, असा आरोप तरुणीच्या भावाने केला होता.

अमरावती : दोन दिवसांनी कब्रस्तानातून तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. माझ्या बहिणीची हत्या झाली आहे. सासरकडील मंडळींनीच ही हत्या घडवून आणली आहे, असा आरोप तरुणीच्या भावाने केला होता.

2 / 5

काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आता या विवाहितेचा मृतदेह दोन दिवसांनी कबरीतून बाहेर काढण्यात आला असून या तिच्या मृतदेहाचे अमरावतीत पुन्हा शवविच्छेदन केले जाणार आहे.

3 / 5

या तरुणीचा हुंड्यासाठी छळ झाला. तिला मारहाण करण्यात आली, असाही आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत्यू झालेल्या तरुणीचेनाव फाझिला जबीन असून ती अवघ्या 19 वर्षांची आहे. या विवाहित तरुणीला दफन केल्यानंतर एक व्हिडीओ समोर आला आहे.

4 / 5

या व्हिडीओमध्ये तिच्या अंगावर जखमा दिसत आहेत. त्यामुळेच संशय वाढला आहे. विशेष म्हणजे मला मारून टाकतील, असा कॉल या विवाहित तरुणीने आपल्या भावाला केला होता, असा दावा केला जातोय. कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतर आता पोलिसांच्या उपस्थितीत कबर उकरून मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे.

5 / 5

मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणीचा जानेवारी महिन्यात विवाह झाला होता. चारच महिन्यांत तिचा संशयास्प मृत्यू झाला आहे. आमच्या मुलीची हत्या झाली आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, आता मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदन केले जाणार असून त्यातून सत्य काय ते समोर येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us