२०२५ मध्ये अस्त झालेल्या मंगळाचा २०२६ मध्ये होणार उदय, या ३ राशींच्या नशिबावर लागलेलं ग्रहण हटेल

१ नोव्हेंबर २०२५ पासून मंगळ ग्रह अस्त अवस्थेत आहेत, जो २०२६ पर्यंत तसाच राहील. नव्या वर्षात २ मे रोजी मंगळ अस्तातून उदय होतील, ज्यामुळे तीन राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया की कोणत्या ३ राशींसाठी मंगळाचा उदय अवस्थेत येणं लाभदायक ठरू शकतं का.

| Updated on: Dec 15, 2025 | 6:45 PM
1 / 6
ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचे सेनापती मानलं जातं, जो व्यक्तीच्या आयुष्यातील विविध पैलूंवर प्रभाव टाकतो. विशेषतः व्यक्तीची ऊर्जा, शक्ती, साहस आणि भावंडांशी संबंधांमध्ये बदल घडवून आणतो. याशिवाय रक्ताशी संबंधित आजार कमी किंवा वाढू शकतात. राशी आणि नक्षत्र गोचरासोबतच मंगळ ग्रह उदय आणि अस्त अवस्थेतही जातो.

2 / 6
दृक पंचांगानुसार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून ३६ मिनिटांवर मंगळ ग्रह अस्त झाले होते, ते पुढील वर्षी २ मे रोजी उदय होतील. शनिवारी सकाळी ४ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मंगळ उदय होणार आहे. आज आम्ही तुम्हाला त्या तीन राशींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचं नशीब २०२६ मध्ये मंगल ग्रहाच्या उदयामुळे चमकू शकतं.

3 / 6
मंगळाचं अस्त होणं वृषभ राशीवाल्यांसाठी फारसं चांगलं नव्हतं. त्यामुळे २०२६ मध्ये जेव्हा मंगळ ग्रह उदय होतील तेव्हा वृषभ राशीवाल्यांना विशेष लाभ होईल असं अनुमान आहे. विशेषतः जातकांच्या साहस आणि उत्साहात वाढ होईल. याशिवाय उत्पन्न आणि संपत्तीतही वाढ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या जवळच्या मित्रासोबत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तो २०२६ मध्ये लाभदायक ठरेल. मे महिन्यानंतर तुमच्या वैवाहिक आयुष्यातही सुख-समाधान राहील.

4 / 6
मंगळाचं उदय होणं सिंह राशीवाल्यांसाठी लाभकारी ठरेल. जे लोक पैशाच्या कमतरतेने त्रस्त आहेत, त्यांनी फिजूलखर्चावर नियंत्रण ठेवल्यास लाभ होईल. यामुळे एकीकडे तुमची बचत वाढेल, तर दुसरीकडे काही छोट्या-मोठ्या स्रोतांमधून धनलाभ होईल. घरात जमिनीशी संबंधित कोणता वाद चालू असेल तर त्यातून मुक्ती मिळेल. याशिवाय तुम्ही गुंतवणुकीसाठी एखादी मजबूत योजना आखाल, ज्यात यश मिळेल. नव्या वर्षात वैवाहिक आयुष्यात कोणती मोठी अडचण निर्माण होणार नाही. तसेच कुटुंबीयांच्या आरोग्यात सुधार होईल.

5 / 6
मंगळ ग्रहाचं उदय अवस्थेत येणं वृश्चिक राशीवाल्यांसाठी शुभ ठरेल. थोड्याच वेळात तुम्हाला आयुष्यात सकारात्मक बदल दिसतील. नोकरीत स्थिरता येईल. बॉस तुमच्या कामाने खुश आणि समाधानी राहतील. याशिवाय नवीन नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे. प्रॉपर्टीशी संबंधित काम करणाऱ्या जातकांना २०२६ मध्ये लाभ होईल असं अनुमान आहे. नव्या वर्षात अविवाहितांना त्यांच्या स्वप्नातील राजा/राणी भेटण्याचे योग आहेत.

6 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)