
सिट्रोन कंपनीच्या इलेक्ट्रिक हॅचबॅक कार Citroen eC3 ला Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये एडल्ट सेफ्टी रेटिंगमध्ये 0 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. भारतीय बाजारात या इलेक्ट्रिक कारची किंमत 12.69 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरुवात होते. (फोटो क्रेडिट- सिट्रोन)

Maruti Suzuki S Presso या कारला क्रॅश टेस्टिंगनंतर एडल्ट प्रोटेक्शनमध्ये 1 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या कारची किंमत 4 लाख 26 हजार रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते. (फोटो क्रेडिट-मारुति सुजुकी)

Maruti Suzuki Ignis सुद्धा पॉपुलर आहे. पण Global NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये या गाडीला एडल्ट प्रोटेक्शनमध्ये 1 स्टार आणि चाइल्ड सेफ्टी मध्ये 0 स्टार रेटिंग मिळाली आहे. या कारची भारतीय बाजारात किंमत 5 लाख 84 हजारापासून (एक्स-शोरूम) सुरु होते. (फोटो क्रेडिट- मारुति सुजुकी)

Hyundai Grand i10 Nios ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या कारला 2 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. भारतात या कारची किंमत 5 लाख 92 हजार (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. (फोटो क्रेडिट- हुंडई)

Maruti Suzuki Eeco ची 2016 मध्ये क्रॅश टेस्टिंग झाली होती. टेस्टिंगनंतर या गाडीला एडल्ट प्रोटेक्शनमध्ये 0 स्टार पण चाइल्ड प्रोटेक्शनमध्ये 2 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली. भारतात या 5 सीटर मिनी वॅन कारची किंमत 5.32 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरु होते. (फोटो क्रेडिट- मारुति सुजुकी)