आगीची भीषण घटना 16 पैकी 15 नवजात बालकांचा मृत्यू, इस्लामाबादमधील रुग्णालयाला आग..
आगीची भीषण घटना घडली आहे. त्यातच आता मोठी माहिती पुढे येतंय. तब्बल 16 पैकी 15 नवजात बालकांचा मृत्यू या आगीत झाला. सकाळी आग लागल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानमध्ये एका रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत तब्बल 15 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील स्त्रीरोग विभागाला ही आग लागली.

ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी तिथे 16 नवजात बालके होती. त्यापैकी 1 जणाला वाचवण्यात यश आले. बाकी 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच बचावकार्य राबवण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी 16 नवजात बालकांवर उपचार सुरू होता. त्यापैकी या आगीतून एका बाळाला वाचवण्यात यश आले.

बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नर्सरीमधील एअर कंडिशनरच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. यामुळे आग लागली आणि काही कळताच सर्वत्र पसरली.

या आगीच्या घटनेने मोठी हाहाकार पसरला आहे. अमरावतीमध्येही अशी घटना घडली. आता पाकिस्तानमधूनही मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे.