
अभिनेत्री मौनी रॉय जिथे जिथे जाते तिथे तिचा सुंदर छोटासा स्वतःला कम्फर्ट करणारा कोपरा शोधून काढत असते. नुकतेच मौनीने आपल्या हॉट समर लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये मौनीने तिच्या अपार्टमेंटमधील खिडकीजवळ बसून हे मोहक फोटोला शूट केलं आहे. स्ट्रॅपलेस पांढर्या ड्रेसमध्ये पोझ दिली आहे.

मौनी रॉयचा हा आऊट फिट हा डिझायनर रितिका ड्रेमेबाज या क्लोदिंग लाइनमधील आहेत. घरातील पाळीव प्राण्यांबरोबरही तिने या ड्रेसवर फोटो शूट केलं आहे.

'शी लव्ह्ड लाईफ अँड लाईफ लव्ह हर राईट बॅक' असे कॅप्शन तिने फोटोंना दिले आहे. तिचे सोशल मीडियावरील वावर हा चाहत्यांना कायम आनंद देणारा असतो

मौनीच्या या फोटोवर तिचा मित्र अभिनेता अर्जुन बिलजलानीने हार्ट ची इमोजी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केली आहे. इतरशोधला मीडियावरील चाहत्यांनीही हॉट च्या इमोजीच्या कमेंट पोस्ट केल्या आहेत.