Mazi Mhanu ka Song : अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारं 50 वर्ष जुनं लोकगीत कुणाचं? व्हायरल गाण्याचा अर्थ काय?

माझी म्हणू का हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी एका धनगर समाजाच्या शाहीराने हे गाणं गायल्याने पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

| Updated on: Aug 02, 2026 | 8:43 PM
1 / 6
सध्या महाराष्ट्रात ही फियाट गाडी माझी म्हणू का ? या गाण्याने धुमाकूळ घातला आहे.  सध्या या गाण्यावर अनेक जण रिल्स करताना दिसत आहेत.

सध्या महाराष्ट्रात ही फियाट गाडी माझी म्हणू का ? या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. सध्या या गाण्यावर अनेक जण रिल्स करताना दिसत आहेत.

2 / 6

फियाट गाडीवरील हे मार्मिक लोकगीत महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलं आहे. त्यांनी या गाण्यातून सामाजिक विषमता आणि गरिबीवर भाष्य केलं आहे.

3 / 6

कर्डक यांच्या 1970-80 च्या काळातील या लोकगीताला आजही पसंती मिळत आहे. या गाण्याच्या माध्यमातून सामाजिक विषमतेची दरी अधोरेखित करण्यात आला आहे.

4 / 6

लोककलेला काळाची मर्यादा नसते, याची पुन्हा प्रचिती आली आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं फियाट गाडीवरील हे गीत आज नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.

5 / 6

काही दिवसांपूर्वी बाळूमामांच्या कार्यक्रमांत धनगर शाहीरांनी केलेल्या सादरीकरणामुळे हे गीत पुन्हा चर्चेत आले आहे. शाहिराच्या आवाजातील गाण्याचं भक्तांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा गजर करत कौतुक केलं.

6 / 6

महाकवी वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीतील शाहीर, कवी आणि वक्ते होते. त्यांनी 1943 साली कविता लेखनाला सुरुवात केली. त्यांची अनेक गाणी अजरामर झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us