
मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसोबत वर्षा या निवासस्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होती.

या बैठकीत मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेत त्यांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.

या बैठकीत मुंबई शहरातील मॉन्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेताना शहरातील नालेसफाई, विविध विकासकामांची सद्यस्थिती, वाहतूक कोंडीची समस्या, रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण कामांची सद्यस्थिती, नगरसेवकांना भेडसावणाऱ्या इतर समस्या यांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

तसेच माजी नगरसेवकांकडून हे प्रश्न समजून घेऊन त्यातील काही प्रश्नांचे तातडीने निराकरणही केले. निर्देश दिल्याप्रमाणे ही कामे करून घ्यावीत तसेच त्यांची प्रगती माझ्यापर्यंत पोहचवावी असे मुख्यमंत्र्यांनी सर्व माजी नगरसेवकांना सांगितले.

याप्रसंगी मुंबई मनपा माजी स्थायी समिती सभापती यशवंत जाधव, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.