राज कपूर यांचं 71 वर्ष जुनं गाणं, थेट हॉलिवूडमधील चित्रपटात वापरलं, विदेशी प्रोड्युसरला इतकं आवाडलं की…
बॉलिवूडमधील काही गाणी आजही खास प्रसंगी आवर्जून ऐकवली जातात. राज कपूर यांच्या ‘श्री 420’ चित्रपटातील एक गाणं अशा किस्स्यांसाठी ओळखले जाते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या कार्यक्रमांमध्येही हे गाणे शाळांमध्ये ऐकायला मिळते.

‘मेरा जूता है जापानी’ हे गाणे 1955 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्री 420’ चित्रपटातील आहे. मुकेश यांनी हे गाणे गायले असून शंकर-जयकिशन यांनी संगीत दिले. गाण्याचे बोल शैलेंद्र यांनी लिहिले आहेत.
‘मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी’ या ओळी आजही लोकप्रिय आहेत. या गाण्यात देशाशी असलेले नाते आणि अभिमान व्यक्त केला आहे. राज कपूर यांच्या खास शैलीमुळे हे गाणे अधिक लक्षात राहिले.
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डेडपूल’ चित्रपटातही हे गाणे ऐकायला मिळाले. चित्रपटाच्या सुरुवातीला कॅबच्या रेडिओवर हे गाणे वाजताना दिसते. त्यामुळे जुन्या हिंदी गाण्याचा हॉलिवूडशी अनोखा संबंध जोडला गेला.
टिम मिलर यांनी हे गाणे न्यूझीलंडमधील एका पबमध्ये ऐकले होते. गाणे आवडल्यानंतर त्यांनी ते ‘डेडपूल’मध्ये समाविष्ट करण्याचा विचार केला. चित्रपटाच्या म्युझिक क्रेडिटमध्येही या गाण्याचा उल्लेख आहे.
‘श्री 420’मध्ये राज कपूर यांच्यासोबत नरगिस आणि नादिरा मुख्य भूमिकेत होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती राज कपूर यांनी केली होती. संगीत शंकर-जयकिशन यांचे होते.