
बुध ग्रह हा बुद्धी, संवाद, तर्क, गणित, तर्कशक्ती आणि व्यापाराचा कारक मानला जातो. याला ग्रहांचा राजकुमारही मानलं जातं. बुध ग्रह 3 ऑक्टोबरला राशी परिवर्तन करणार आहे. बुधाचं हे गोचर कन्या राशीतून तुळ राशीत होईल. हे गोचर 3 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 3 वाजून 47 मिनिटांनी होईल. बुध ग्रहाच्या या गोचरामुळे अनेक राशींना लाभ मिळणार आहे. आता या राशी कोणत्या जाणून घ्या..

कन्या राशीच्या लोकांना या गोचरामुळे लाभ मिळेल. पैसा कमावण्याच्या नव्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात लाभ होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना शुभ बातम्या मिळतील.

बुध ग्रहाच्या या गोचराचा कर्क राशीच्या लोकांवर प्रभाव पडेल. हे गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून शुभ राहील. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल आणि थांबलेले पैसे परत मिळू शकतील. जे लोक अभ्यास करत आहेत त्यांना अभ्यासात यश मिळेल आणि घर-परिवाराशी चांगले संबंध निर्माण होतील.

कुंभ राशीच्या लोकांना बुधाच्या राशी परिवर्तनाचा फायदा होईल. जे लोक परदेशात जाऊन नोकरी किंवा शिक्षणाची योजना आखत आहेत त्यांना यश मिळू शकतं. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. नोकरी आणि व्यापारात प्रगतीचे योग बनत आहेत.

बुधाच्या गोचरामुळे तुळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवन सुखी राहील. नव्या योजनांची सुरुवात करण्यासाठी हा चांगला काळ आहे.

वृश्चिक राशीच्या लोकांना बुधाच्या गोचरामुळे लाभ मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील आणि व्यापार-नोकरीत प्रगती होईल. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव येईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच आंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)