Miss World 2025 : भारताच्या नंदिनी गुप्ताचं स्वप्न भंगलं; ‘या’ देशाच्या तरुणीने जिंकला ‘मिस वर्ल्ड’चा किताब

मिस वर्ल्ड या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत थायलंडने बाजी मारली असून भारताच्या नंदिनी गुप्ताला आठव्या स्थानी समाधान मानावं लागलं. थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगास्रीने मिस वर्ल्डचा किताब जिंकला आहे.

| Updated on: Jun 01, 2025 | 9:25 AM
1 / 5
हैदराबाद इथं शनिवारी झालेल्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत थायलंडच्या ओपन सुचाता चुआंगस्री हिने बाजी मारली. गेल्या वर्षीची विश्वसुंदरी क्रिस्टिना पिस्झकोवा हिने ओपल सुचाला हिच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट चढवला. इथिओपियाची हॅसेट डेरेजे अदमासू हिने दुसरा, तर पोलंडची मेय क्लाजदा हिने तिसरा क्रमांक मिळवला.

2 / 5
अभिनेता सोनू सूद, उद्योगपती  सुधा रेड्डी, माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर, अभिनेता राणा डग्गुबती यांचा परीक्षकांमध्ये समावेश होता. ओपल सुचाता ही थायलंडच्या फुकेतमध्ये लहानाची मोठी झाली. ती आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदवी घेत असून ती मॉडेलसुद्धा आहे. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी तिने बरंच सामाजिक कार्य केलंय.

3 / 5
वयाच्या 16 व्या वर्षी ओपल सुचाताला तिच्या ब्रेस्टमध्ये एक गाठ आढळली होती. ही गाठ सौम्य प्रकारची असली तरी थायलंडमध्ये स्तनाच्या कर्करोगाबद्दल आणि त्याच्या लवकर निदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यास तिला प्रेरणा मिळाली.

4 / 5
ओपल सुचाताने याआधी मेक्सिको सिटीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेत थायलंडचं प्रतिनिधित्व केलं होतं. या स्पर्धेत ती तिसरी उपविजेती ठरली होती. परंतु 'मिस युनिव्हर्स थायलंड'ची तिसरी उपविजेती म्हणून 12 महिने पूर्ण करण्याआधीच तिने 'मिस वर्ल्ड थायलंड 2025'चा किताब जिंकल्याने तिचा उपविजेतीचा किताब मागे घेण्यात आला.

5 / 5
यावर्षी जगभरातील 108 स्पर्धकांनी 'मिस वर्ल्ड' या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत मॉडेल नंदिनी गुप्ताने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. नंदिनीने टॉप 20 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं होतं.