यार ही किती सुंदर दिसतेय, क्रॉप टॉपमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
मराठमोळ्या अभिनेत्रीचं निसर्गाच्या सानिध्यात खास फोटोशूट. स्टायलिश क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स पोजने वेधले सर्वांचे लक्ष. कोण आहे ही अभिनेत्री?

मराठीसह हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या तिच्या खास लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनयासोबतच सोशल मीडियावरील सक्रियतेमुळेही मिथिला चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
तिचा साधा, सहज आणि प्रसन्न अंदाज चाहत्यांना नेहमीच भावतो. नुकतेच मिथिलाने निसर्गाच्या सानिध्यात खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने स्टायलिश क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स असा कॅज्युअल लूक परिधान केला आहे.
तिच्या या साध्या पण आकर्षक स्टाइलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मिथिलाला निसर्गरम्य ठिकाणी फिरायला आवडत असल्याचे तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसून येते. सप्टेंबर महिन्यात तिने कोकण सफर करतानाचे काही सुंदर फोटो शेअर केले होते.
मिथिला पालकरने वेब सीरिज, हिंदी चित्रपट आणि मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयासोबतच तिच्या फॅशन स्टाइलचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे.