
मद्यपान करणाऱ्या प्रत्येकाचा आपला असा आवडता ब्रँड असतो. तरीदेखील काही मद्यपी नशा जास्त चढावी म्हणून वेगवेगळे प्रयोग करतात. त्यासाठी दोन प्रकारचे मद्य एकत्र करून पिण्याचाही काही लोक प्रयत्न करतात.

परंतू दोन प्रकारची मद्ये एकत्र करून प्यायल्याने खरंच नशा चढते का? दोन प्रकारची मद्य एकत्र करुन पिल्यास त्याचा शरीरावर काही वाईट परिणाम होतो का? असे प्रश्न नेहमीच विचारले जातात.

तज्ज्ञांच्या मतानुसार दोन प्रकारची मद्यं एकत्र करून पिल्याने नशा येतेच असे नाही. संबंधित मद्यात नेमके किती अल्कोहोल आहे, यावरून नशा चढणार की नाही हे अवलंबून असते, असे सांगितले जाते.

दोन मद्ये मिक्स केल्याने मद्याचा गंध, चव बदलू शकते. परंतु मद्यात असलेल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून किती नशा येईल हे ठरवता येऊ शकते.अनेकदा बिअरमध्ये व्हिस्की एकत्र करून प्यायल्याने नशा वाढते, असे सांगितले जाते.

पण बिअर आणि व्हिस्कीमध्ये असलेल्या अल्कोहोलच्या प्रमाणानुसारच नशा येते. प्रत्येक मद्यात अक्लोहोलचे प्रमाण वेगवेगळे असते. ते मोजण्यासाठी ABV Alcohol by Volume हे एकक वापरले जाते.

(टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. मद्यपान करू नये. या लेखात इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या स्त्रोतांच्या आधारे माहिती देण्यात आली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)