या अभिनेत्रीसोबत इंटीमेट सीन देताना अभिनेता विसरलेला भान, कट म्हणताच दिग्दर्शकाला केली शिवीगाळ

बोल्ड आणि हॉट फोटोंनी चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीसोबत इंटीमेट सीन देताना अभिनेता विसरलेला भान, दिग्दर्शकाने कट म्हणताच केली शिवीगाळ.

| Updated on: Mar 28, 2026 | 1:12 PM
1 / 5
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा हिने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील काही धक्कादायक अनुभव नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शेअर केले आहेत. सध्या टीव्ही विश्वातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मोनालिसाने इंडस्ट्रीतील संघर्ष आणि वास्तव यावर स्पष्टपणे भाष्य केले.

2 / 5

मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की, इंटीमेट सीन करताना कधी कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला का? यावर उत्तर देताना तिने कबूल केले की, काही वेळा असे प्रसंग घडले आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका अभिनेत्याने इंटीमेट सीनच्या वेळी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता.

3 / 5

मोनालिसाने सांगितले की, त्या सीननंतर दिग्दर्शकाने कट म्हटल्यावर अभिनेता संतापला आणि त्याने दिग्दर्शकालाच शिवीगाळ केली. हा अनुभव तिच्यासाठी धक्कादायक होता पण अशा परिस्थितीत स्वतःला सावरत तिने काम सुरू ठेवले.

4 / 5

तिने आपल्या सुरुवातीच्या काळाबद्दल बोलताना सांगितले की, इंडस्ट्रीत आल्यावर तिला प्रामुख्याने अडल्ट आणि बी-ग्रेड चित्रपटांचेच प्रस्ताव मिळत होते. आर्थिक गरजेमुळे तिने अशा सुमारे 25 चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

5 / 5

मोनालिसाच्या मते, कमी बजेटच्या चित्रपटांमधूनच तिला पुढे जाण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच तिचा प्रवास घडत गेला. त्यामुळे तिला आपल्या केलेल्या कामाबद्दल कधीच पश्चात्ताप वाटला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us