ATM मधून पैसेच निघेनात… भर उन्हात लोकांच्या रांगा, महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील नागरिक त्रस्त; तुमच्याकडची परिस्थिती काय?

ATM Cash Shortage : राज्यातील काही जिल्ह्यांमधील एटीएममध्ये पैशांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच काही जिल्ह्यांमधील निवडक एटीएम सुरू आहेत, त्यामुळे त्यांच्याबाहेर लोकांनी रांगा लावल्या आहेत.

बापू गायकवाड | Updated on: May 09, 2026 | 2:55 PM
1 / 5
लातूर जिल्ह्यातल्या अनेक चलन तुटवडा पहायला मिळत आहे, ATM मध्ये देखील खडखडाट जाणवत आहे , ATM मध्ये पैसे नसल्याने ऐन लग्न सराईत नागरिकांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

लातूर जिल्ह्यातल्या अनेक चलन तुटवडा पहायला मिळत आहे, ATM मध्ये देखील खडखडाट जाणवत आहे , ATM मध्ये पैसे नसल्याने ऐन लग्न सराईत नागरिकांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

2 / 5

चलन तुटवड्यामुळे लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक एटीम सध्या बंद आहेत. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अकाऊंटमध्ये पैसे असतानाही पैसे मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

3 / 5

एका नागरिकांने म्हटले की, आतापर्यंत मी 5 एटीएममध्ये गेलो पण पैसे नाहीत, बँकांमध्येही पैसेही नाहीत. त्यामुळे आम्हाला त्रासाचा सामना करावा लागत आहे असं म्हणत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

4 / 5

परभणीतही एटीएम बंद आहेत. कॅश उपलब्ध नसल्याने बँकेकडून अनेक एटीएम बंद करण्यात आले आहेत. तुरळक ठिकाणीच एटीएमवर पैसे उपलब्ध असल्याने एटीएम बाहेर नागरिकांची गर्दी झाली आहे.

5 / 5

परभणीत काही एटीएमवर 100 रुपयांच्या नोटा मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कॅश मिळत नसल्याने आर्थिक व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us